Sunday, September 13, 2026
Homeजळगांव शहरजि.प.माध्य.शिक्षण विभाग ,मुख्याध्यापक संघ विद्यमाने शाळा प्रवेशोत्सव पूर्व तयारी व नवीन शैक्षणिक...

जि.प.माध्य.शिक्षण विभाग ,मुख्याध्यापक संघ विद्यमाने शाळा प्रवेशोत्सव पूर्व तयारी व नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात सभा संपन्न

जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ला.ना.विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव पूर्व तयारी व नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.सदर सभेत उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी ,रागिनी चव्हाण,वेतन पथक अधिक्षक दिलीप पवार तसेच मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे के अण्णा पाटील तसेच जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष डॉ.आर डी निकम हे उपस्थित होते सदर सभेचे सूत्रसंचालन रागिणी चव्हाण यांनी केले.सभेच्या सुरुवातीस डॉ आर डी निकम यांनी शाळा स्तरावरील विविध समित्या एकत्रीकरण झालेल्या समितीच्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी शालेय स्तरावर जतन करावयाची विविध अभिलेखे संदर्भात मार्गदर्शन केले व अंशत अनुदानित अथवा विना अनुदानित शाळा वरून अनुदानित शाळा वर करावयाच्या बदली संदर्भातील कार्यपद्धती बाबत नवीन प्रणालीनुसार कामकाज करावे याबाबत सखोल माहिती दिली.चंद्रकांत गवळी साहेब यांनी संच मान्यतेच्या बाबतीत घ्यावयाची काळजी संदर्भात माहिती दिली वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार साहेब यांनी मुख्याध्यापकांनी पगार बिल टाकण्याच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतीत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले तसेच इथून पुढे दरमहा एक तारखेलाच पगार होईल यासाठीचे नियोजन करणे चालू आहे असे सांगितले,जे.के अण्णा पाटील यांनी मुख्याध्यापकांनी शाळा प्रशासन यशस्वीतेसाठी व विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात काय काळजी घ्यावी तसेच शासनाच्या नवीन निर्णयानुसार अनुकंपा धोरणबाबत सखोल मार्गदर्शन केले, आपत्ती व्यवस्थापन याबाबत आपल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करावे असे सांगितले.प्रमुख मार्गदर्शक  शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांनी सर्व मुख्याध्यापकांना शाळा प्रवेशोत्सव संदर्भात पूर्वतयारीबाबत माहिती सांगितली तसेच दोन दिवसांमध्ये आपण आपली संपूर्ण शाळा आपला परिसर स्वच्छ करून घ्यावा,विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात नियमांचे पालन करावे शाळेच्या पहिल्या दिवशी वरीष्ठ अधिकारी भेटी देणार आहे.पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी याबाबतीत तसेच आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण विविध वेगवेगळे उपक्रम शालेय स्तरावर राबवावे शासनाकडून विविध मिळणारे लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवावे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भामधील ज्या काही योजना असतील त्याही त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप,पाचवी नवोदय,इयत्ता आठवी एन एम एस तसेच तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इन्स्पायर अवार्ड मध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे याबाबतीतही सखोल असे मार्गदर्शन केले तसेच एक पेड माँ के नाम अंतर्गत सर्व शाळांनी सहभागी होऊन त्याची नोंद अमृतवृक्ष अँप मध्ये करावी व उपक्रम यशस्वी करावा.जून जुलै मध्ये होणाऱ्या दहावी बारावी पुरवणी परीक्षांमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी नियोजन करावे.तसेच पुढील वर्षी गुणवत्तापूर्ण निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.जादा तासिका घेऊन प्रश्नपत्रिका सोडवून सराव अधिकाधिक करून घ्यावा.परीक्षा केंद्रांमध्ये शंभर टक्के सीसीटीव्ही बसवण्यात यावे सभेप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सभेचे आभार चव्हाण मॅडम यांनी मानले सभेस संपूर्ण जिल्ह्याभरातून सर्व मुख्याध्यापक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या