Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरजागतिक महिला दिनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण महिला मंडळातर्फे आनंदाचे सूर कार्यक्रम उत्साहात...

जागतिक महिला दिनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण महिला मंडळातर्फे आनंदाचे सूर कार्यक्रम उत्साहात संपन्न…

जळगांव – दि.९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण महिला मंडळातर्फे आनंदाचे सूर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला अनेक कलावंतांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.तुज मागतो मी आता, ये मोह मोह के धागे, पायोजी मैंने, सांज ये गोकुळी,कुहू कुहू बोले कोयलिया,अबीर गुलाल अशा हिंदी मराठी गाण्यांनी व मनोवेधक नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
जागतिक महिला दिनानिमित्त भोईटे नगर येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात कलावंतांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. स्वरा पाठक व्हायोलीन, राजेश्वरी रत्नपारखी बासरी, वरदा देशमुख गायन,ऋचा जेऊरकर तबलावादन तसेच शुभांगी पाटील व गार्गी जेऊरकर यांच्या राजस्थानी आणि स्पॅनिश नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू तोंडुलकर तर आभार सचिव मीनल कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमासाठी अध्यक्षा विशाखा देशमुख उपाध्यक्ष मनीषा पापरीकर तसेच वर्षा कुलकर्णी राधा जेऊरकर ,प्रांजली शिरवाळकर आणि तेजश्री व प्राची जेऊरकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमासाठी बहुसंख्येने स्त्री-पुरुष उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या