जळगांव दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ वे बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन १३ जुलै, रविवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉल, जळगाव येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलन अध्यक्षस्थानी डॉ.फुला बागुल असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूभाऊ भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजिवकुमार सोनवणे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे तसेच प्रमुख अतिथी निवृत्त डी. वाय. एस.पी. राजेंद्र रायसिंग, लोकमतचे मुख्य संपादक किरण अग्रवाल, निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब निळकंठ गायकवाड, लेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे,बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी बहिणाबाई सोपानदेव चौधरी मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात येईल. संमेलनात पोस्टर पोएट्री व खानदेशातील कवी-कवयित्रीं च्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर करतील.
दुसऱ्या सत्रात परिसंवादआणि ती लिहीती झाली च्या अध्यक्षस्थानी ॲड. विलास मोरे असून सहभागी प्रा. संध्याताई महाजन आणि मंजुषाताई पाठक होणार आहेत. चौथ्या सत्रात कथाकथन कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगकर्मी प्रा. दिलीप जाने असून प्रा. गोपीचंद धनगर आणि कु. संस्कृती पवनीकर कथा सत्र सादर करतील. पाचव्या बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास च्या अध्यक्षस्थानी मायाताई धूप्पड असून जयश्रीताई काळवीट, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र सोनवणे य सहभागी होतील. कवी समेलनाच्या सहाव्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.बी.एन. चौधरी असून खान्देशातील मान्यवर कवी कविता सादर करतील.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा ताई हुंडीवाले असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व कर्वीच्या सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. खान्देशातील साहित्यिकांनी साहित्य संमेलनात आवर्जून बहुसंख्येने उपस्थित राहून लाभघ्यावा असे विनम्र आवाहन निमंत्रक डॉ. विलास नारखेडे व लिलाधर नारखेडे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, प्रा. संध्या महाजन व ज्योती राणे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
