Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरजळगाव येथील दोन स्टार्टप्सला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२६...

जळगाव येथील दोन स्टार्टप्सला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरव..

नाशिक – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथे ११ जुलै रोजी अरुहील सोल्यूशन्स प्रा. लि.च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (Founder & CEO) महाजन आणि परिवर्तन इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक निखिल  जाधव यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा’ यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५–२६’प्रदान करून गौरविण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
केळीच्या वाया जाणार्‍या खांबापासून,तंतू व लगद्यापासून पर्यावरणपूरक बेबी डायपर्स आणि प्रौढांसाठी डायपर्स विकसित करण्याच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी महाजन यांची निवड करण्यात आली. शेतीतील टाकाऊ अवशेषांचा उपयोग करून जैवविघटनशील स्वच्छता उत्पादने तयार करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ आरोग्याला प्रोत्साहन देणे तसेच महिलांसाठी रोजगारनिर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.परिवर्तन इनोव्हेशन्सच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२१ पासून आपण ईव्ही क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करत असून, केवळ ३ तासांत पेट्रोल वाहनाचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करण्याचे किफायतशीर तंत्र विकसित केले आहे. ‘अन्विक्षिकी’ या पेटंटेड मशीनद्वारे ईव्ही रिपेअरिंग अधिक सुलभ केले असून, ३० मिनिटांत ऑन-साइट रिपेअरिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ‘ईव्ही अकॅडमी’च्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण व १००% प्लेसमेंट किंवा स्वतःचे ईव्ही सर्व्हिस सेंटर सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.या दोन्ही नाविन्यपूर्ण स्टार्टअपला जळगावच्या KCIIL आणि संभाजीनगरच्या MAGIC इन्क्युबेशन सेंटरचे पाठबळ लाभले आहे.या पुरस्कारामध्ये ₹२१,००० रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि प्रेरणादायी पुस्तकांचा संच प्रदान करण्यात आला.यावेळी दोन्ही पुरस्कारार्थी यांनी संभाजीनगर येथील मॅजिक इन्क्युबेशनचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही या माध्यमातून स्टार्टअपच्या विस्तारासाठी आणि सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात अधिक प्रभावी कार्य करण्यासाठी संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याशिवाय यशवंतराव चव्हाण सेंटर, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक, परीक्षक मंडळ, उपस्थित मान्यवर आणि संपूर्ण आयोजन समितीचे त्यांनी विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या