Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरजळगाव पोलीस दलासाठी‘आरोग्य कवच’यशस्वी; २६० हून अधिक पोलीस व कुटुंबीयांनी घेतला तज्ज्ञ...

जळगाव पोलीस दलासाठी‘आरोग्य कवच’यशस्वी; २६० हून अधिक पोलीस व कुटुंबीयांनी घेतला तज्ज्ञ सेवांचा लाभ..

जळगाव,- दि.१६(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
श्री.चामुंडमाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी.ई.तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील पदमांलय मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत होमिओपॅथी आरोग्य तपासणी शिबिरास पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या आरोग्य शिबिरात एकूण २६० पोलीस कर्मचारी , महिला पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदवून विविध आरोग्य तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला.शिबिरातील मोफत आरोग्य सेवेत मोफत होमिओपॅथी तपासणी व औषधोपचार रक्तातील साखर तपासणी (BSL),टी.टी.लसीकरण (TT Vaccination)
रक्तदाब तपासणी (BP),रक्तगट तपासणी (Blood Group )मोफत नेत्र तपासणी करण्यात आली

लाभले तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

शिबिरात विविध विभागातील अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली यात डॉ.सुरेश अग्रवाल–सांधेदुखी व अस्थिरोग (Joint & Bone)
डॉ.सिद्धेश्वर पाटील – दीर्घकालीन आजार व मेडिसीन,डॉ.अमिता श्रीवास्तव – स्त्रीरोग व मेडिसीन
श्री.जयेश वाल्हे – नेत्रचिकित्सक या आरोग्य तपासणी सेवेत सहाय्यक कर्मचारी श्रीमती फर्जाना बी. बागवान यांनी मेडिसिन डिस्पेंसर म्हणून औषध वितरणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
श्रीमती फाल्गुनी सोनवणे व आकाश सोनवणे यांनी लॅब पॅथॉलॉजी तपासण्या पार पाडल्या.शिबिराच्या नियोजन व समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी (PRO) श्री. नवल परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रशिक्षणार्थींचे मोलाचे योगदान
महाविद्यालयातील सिनियर व ज्युनिअर प्रशिक्षणार्थींनी रुग्ण नोंदणी, मार्गदर्शन,लसीकरण,बीपी-तापमान तपासणी तसेच औषध वितरण या सर्व कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.
पोलीस प्रशासनाने श्री.पी.ई.तात्या पाटील हॉस्पिटल व चामुंडमाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या