जळगाव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) चामुंडमाता मेडिकल कॉलेज व पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार,दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी पदमांलय मल्टीपर्पज हॉल,पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर,जळगाव येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत होणार आहे.या शिबिरामध्ये सर्वसाधारण व दीर्घकालीन आजार, स्त्रीरोग, सांधेदुखी व अस्थिरोग,नेत्र तपासणी तसेच फिजिओथेरपीसंबंधी मोफत तपासणी करण्यात येणार असून रुग्णांना आवश्यक ते मोफत होमिओपॅथी औषध वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी कोणतीही पूर्व नोंदणी आवश्यक नसून, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जळगाव पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषध वाटप शिबिर
RELATED ARTICLES
