Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरजळगाव जनता सहकारी बँकेचा वृक्षारोपण उपक्रम; सात वर्षांत ५०० हून अधिक वृक्षांची...

जळगाव जनता सहकारी बँकेचा वृक्षारोपण उपक्रम; सात वर्षांत ५०० हून अधिक वृक्षांची लागवड

जळगाव – दि.२६ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने दि. २६ जुलै २०२६ रोजी बेंडाळे स्टॉप मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत ५०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,या परिसरातील नागरिकांनी स्वतःहून या वृक्षांचे पालकत्व स्वीकारत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.या वृक्षारोपण कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष सीए नितीन झावर,संचालक मधुकर पाटील, संचालिका डॉ.सौ.आरती हुजूरबाजार,सौ.संध्याताई देशमुख तसेच गणेश कॉलनी शाखेचे खातेदार पांडुरंग इंगळे यांच्यासह बँकेचे पदाधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.जळगाव जनता सहकारी बँकेचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल मानला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या