Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरजळगांव कराओके सिंगर्स ग्रुप्स असोसिअशनची स्थापना

जळगांव कराओके सिंगर्स ग्रुप्स असोसिअशनची स्थापना

जळगांव – दि.२६(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगाव शहरातील सर्व कराओके ग्रुप्सची स्थापने बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.अध्यक्ष-सत्यनारायण खटोड,उपाध्यक्ष -डॉ.सुशीलकुमार राणे,खजिनदार- सुरेश तायडे,सचिव – गौरव मेहता, सह सचिव-प्रदीप अहुजा यांची निवड झाली.भागवत पाटील,विजय शास्त्री,रमेश पेहलानी, वर्षा चौधरी हे कार्यकारिणी सदस्य आहेत व राजेंद्र सराफ व कंचन तायडे हे आमंत्रित सदस्य आहेत तसेच अन्य अनेक प्रसिद्ध पुरुष व महिला गायक कलाकार संस्थेचे सदस्य आहेत.जळगाव शहरातील सर्व कराओके ग्रुप व कलाकार ह्या असोसिएशन चे सदस्य होण्यास पात्र राहतील.शहर स्तरावर कराओके स्पर्धा व स्टेज प्रोग्राम आयोजित करणे तसेच कराओके गायकांकरिता कल्याणकारी उपाययोजना संस्थे तर्फे राबविल्या जातील.कराओके गायन लोकप्रिय बनविणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या