Wednesday, April 15, 2026
Homeजळगांव जिल्हाजळके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’उत्साहात.... पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या...

जळके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’उत्साहात…. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप..जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती…


जळके – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळातील जळके येथे गजानन महाराज मंदिर परिसरात रविवारी सकाळी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबीराचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे जळगाव,तहसीलदार जळगाव श्रीमती शितल राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी मा.तहसीलदार जळगाव ,विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.एकूण 600-700 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात आल्या रहिवासी प्रमाणपत्र, डिजिटल, सातबारा दुरुस्ती, जातप्रमाणपत्र, संजय गांधी योजना, वारस नोंदी, उत्पन्न दाखले, फार्मर आय डी , विविध कृषी योजना, आरोग्य विभागाच्या योजना अशा सेवांचा समावेश होता.याशिवाय अकृषक तरतुदीतील सुधारणा, विकास आराखड्यानंतर अकृषक परवानगीची नवीन व्यवस्था तसेच एकदाच अधिमूल्य भरण्याच्या सोप्या पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार मॅडम यांनी केले,यावेळी तहसीलदार शितल राजपूत,नायब तहसीलदार डीगंबर जाधव,मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे,प्रवीण बेंडाळे,ग्राम महसूल अधिकारी फिरोज खान,सुदेश चौधरी,पायल गुप्ता, माधुरी साळुंखे,स्नेहा साखरे गट विकास अधिकारी जळगाव, तालुका कृषी अधिकारी थेऊरकर मॅडम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या