Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहर"जय किसान फार्मर्स फोरम"चे कृषिरत्न पुरस्कार जाहीर २७ डिसेंबरला राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा...

“जय किसान फार्मर्स फोरम”चे कृषिरत्न पुरस्कार जाहीर २७ डिसेंबरला राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा नाशिक येथे सपत्निक सन्मान..

जळगाव/दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त जय किसान फार्मर्स फोरम, गोदावरी बायो फर्टिलायझर्स इंडस्ट्री आणि ‘आमची माती आमची माणसं;तर्फे २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प. सा. नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, नेहरू गार्डन, नाशिक येथे सह्याद्री फार्मचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे, आमदार राहूल ढिकले, माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, मल्टीमोलचे संचालक शशिकांत शेट्टी, विविध भारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ. संतोष जाधव, ओम गायत्री ग्रुपचे मधुकर गवळी, कृषीतज्ञ लक्ष्मण डोळे, इफकोच्या माजी संचालिका साधना जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य बापूसाहेब शिंदे आदि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी दिली.पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये यादवराव केशवराव ढवळे, दिपक दगुजी पवार, श्रीराम भानुदास तायडे, निवृत्ती अशोक शिंदे, प्रकाश केशवराव गडदे, गणेश एकनाथ पवार, तेजस नर्सरी, संतोष बाबुराव गवारे, विक्रम बाळासाहेब महाले, सचिन सोनोने, शाम भगवान बन, सय्यद गनीभाई हुसेन, युवराज बाळासाहेब जाधव, गजानन भानुदास परिहार, प्रितम दिलीप शिसोदे, बाळू पंडित बहिरम, अभिमन्यू लक्ष्मण ठाकरे, दत्तू केवजी बागूल, देवराम अनाजी पालवी, बापू वसंत पगार, प्रविण छगन जाधव, अभयसिंह मोहनराव पाटील, राजेश गंगाधर मुसळे, नितीन लक्ष्मण शेवाळे, अनिल भाऊराव देवरे, श्वेता संजय इंगळे, सुनिल दामोदर धात्रक, रमेश पांडुरंग ठोसरे, शिवकृपा ऑनलाईन ई-सेवा आधार केंद्र, नंदिनी महेंद्र जाधव, रोहिदास बापूराव पाटील, पांडुरंग जीवामृत युनिट, युवराज जाधव, समीर शेख, रविंद्र दिनकर जगताप यांचा समावेश आहे. ट्रॉफी, पैठणी साडी, सन्मानपत्र, फेटा, शेतकरी गौरव विशेषांक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी सेंद्रिय शेती चर्चासत्र होणार आहे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हॉईस ऑफ नाशिक व प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सुमधुर गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या देखण्या सोहळ्याचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार व दमदार शैलीत प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे करणार आहे.शेतकरी बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, बाळासाहेब मते, निवृत्ती न्याहारकर, सविता जाधव, मयुर गऊल, सागर रहाणे, शाम गोसावी, उत्तम रौंदळ, वसंत आहेर, सुयोग जाधव, राजेंद्र धोंडगे, शाम खांडबहाले, संकेत लामखडे, अशोक देशमुख, शांताराम कमानकर, रावसाहेब थेटे, संदिप उफाडे, सुनिल गमे, पुंजाजी मालुंजकर, स्नेहल लामखडे आदिंनी
केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या