Wednesday, April 15, 2026
Homeजळगांव जिल्हाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्षेत्रीय रेल्वे उपयोग कर्ता परामर्श यात्री समितीची...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्षेत्रीय रेल्वे उपयोग कर्ता परामर्श यात्री समितीची १२६ वी बैठक संपन्न..जळगावचे समिती सदस्य दिपक साखरेंना मिळाली २ विषय मांडण्याची संधी..

मुंबई – दि.०५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्षेत्रीय रेल्वे उपयोग कर्ता परामर्श यात्री समितीची १२६वी मिटिंग संपन्न झाली.त्यात जळगाव येथील रेल्वे सल्लागार समिती सदस्य दीपक साखरे यांना २ विषय मांडण्याची संधी मिळाली.त्यासंधीचा पुरेपूर उपयोग करीत जळगाव जिल्ह्याच्या रेल्वे      प्रवाशांच्या आवश्यक विविध सुविधा, समस्या ,अडी-अडचणी व नवीन थांबे याविषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकून समिती समोर बैठकीत अभासू मुद्दे मांडून पाठपुरावा केला.समस्या निदर्शनास आणून देत साखारेंनी भुसावळ ते पुणे जाणारी गाडीला जळगाव नियमित १ थांबा द्यावा तसेच सकाळी ६ वाजे नंतर मुंबई येथे जायला जळगाव येथून जायला गाडी नसते तर भुसावळ येथून सकाळी ६ ते ८ पर्यंत ५ गाड्या थेट मनमाड जातात त्या गाडयांना जर जळगावला थांबा दिला तर जळगावच्या लोकांना मोठा लाभ होईल हे लक्षात आणून दिले.तसेच प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडली.अन्य विषय वेळेअभावी रेल्वे प्रशासनाने नोंद घेत योग्य कारवाई करू असे आश्वासन या प्रसंगी दिले.या बैठकीला खा.ज्ञानेश्वर पाटील,खा.अनुप धोत्रे महाप्रबंधक धरमवीर मीना अतिरिक्त महाप्रबंधक मंडल उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या