Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरचैत्र पालवी स्वरोत्सव उत्साहात संपन्न.

चैत्र पालवी स्वरोत्सव उत्साहात संपन्न.

जळगांव – दि.१९(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” मैफल गुढी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात उत्साहात संपन्न झाली.भक्ती गीते, अभंग, नाट्यगीत व सुगम सांगितले नटलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.कार्यक्रमाची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरे नुसार गुरु वंदनेने झाली.गुरु वंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सदर केली.दीप प्रज्वलन जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक व महापौर सौ.दीपमाला काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विवेकानंद कुलकर्णी,आमदार श्री.राजूमामा भोळे व दीपक चांदोरकर यांच्या हस्ते झाली.आणि सुरू झाला एक सुरेल मंगलमय गीतांचा प्रवास.श्री. वरूण नेवे,सौ.श्रुती जोशी व बासरी वर राजेश्वरी रत्नपारखी यांनी गीते सादर केली.यात प्रामुख्याने ओंकार स्वरूपा-श्रुती,वरुण आरंभी वंदिन अयोध्येचा राजा-वरुण,गगन सदन तेजोमय-श्रुतीशून्य गड शहर-वरूण,देवाघरचे ज्ञात कुणाला-श्रुती आम्हा नकळे ध्यान-वरुण,मन मंदिरा-बासरी राजश्री,विष्णुमय जग-वरुण संत भार पंढरीत-श्रुतीबाजे मुरलिया बाजे-श्रुती वरुण,मी राधिका-श्रुती,रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा-राजेश्वरी बासरी,अवघा रंग एक झाला या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवते निवेदन सौ. प्रिती झारे यांनी करून ही मैफल एका विशिष्ट उंचीवर नेली.आभार प्रदर्शन सौ.नुपुर खटावकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्निग्धा कुलकर्णी व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन चे सहकार्य मिळाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या