Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरगुरुपौर्णिमेनिमित्त "भक्तीनाद" ग्रुपतर्फे भजन संध्येचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त “भक्तीनाद” ग्रुपतर्फे भजन संध्येचे आयोजन..

जळगाव | दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्थानिक “भक्तीनाद” भजन संध्या ग्रुप यांच्या वतीने भक्तिमय भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा स्वरमय सोहळा दि.२९ जुलै २०२६, बुधवार रोजी सायंकाळी ७:०० वाजता मोहाडी रोड येथील श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात गुलाब कापडणे, विनायक रडे, सुभाष मिस्त्री, वृंदा पालखे,प्रवीण पाटील आदी कलाकार भक्तिगीतांचे सुमधुर सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व बहारदार निवेदन “भक्तीनाद” ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे करणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक गुरुपूजनाने होणार असून त्यानंतर “गण गण गणात बोते…” या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण, गुरुभक्तीचा जागर आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तिमय सोहळ्यास परिसरातील सर्व नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन भक्तीनाद ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे तसेच संतश्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्ट,जळगावचे अध्यक्ष अरुण सोनवणे,उपाध्यक्ष ॲड.प्रकाश दप्तरी,सचिव संजय येवले तसेच विश्वस्त प्रकाशचंद्र वडनेरे,मधुकर पाटील,हेमंत विसपुते,अतुल मुळे,सुधीर सोनवणे आणि रवींद्र पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या