Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरगरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा..वुमेन्स...

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा..वुमेन्स चाईल्ड केअर प्लस तर्फे वही वाटप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप ..

जळगाव- दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस ही संस्था कष्टकरी महिला आणि त्यांच्या पाल्यांसाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेत आमदार राजुमामा भोळे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. शाळा लांब असलेल्या आणि गरजू विद्यार्थिनींना सुलभ शिक्षणासाठी सायकल पुरविण्यात येईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.रविवारी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.आधार जेष्ठ नागरिक संघ यांच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०० विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी,जैन इरिगेशनचे अधिकारी पी.एस.नाईक,मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील,महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी,आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संभाजीराव देसाई आणि अध्यक्षस्थानी आमदार राजुमामा भोळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा सौ.शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय देत जैनइरिगेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्याबद्दल अशोकभाऊ जैन यांचे आभार मानले.तसेच संस्थेचा उद्देश केवळ शैक्षणिक मदत न करता चांगले संस्कारयुक्त नागरिक घडविण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी आपल्या भाषणात आमदार राजुमामा भोळे म्हणाले,“विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे आणि चांगले संस्कार घेतले पाहिजेत.आई-वडील,शाळा,शहर,राज्य आणि देशाचे नाव उज्वल करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे.मी नेहमी तुमच्यासोबत आहे, तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊ शकता,”असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.पाहुण्यांनी आपल्या भाषणांतून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय अर्चना पाटे यांनी करून दिला. शेवटी शालिनी चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरला सूर्यवंशी, तनुजा चोपडे, श्यामल शिंदे,छाया पाटील, ज्योती दातेराव, सुनीता महाजन,चंद्रकला पाटील, संगीता पाटील, भारती पाटील,पूजा पंडित,कामिनी पांडे,वंदना पांडे, रुपाली पवार,प्रणाली नेवे,साक्षी सूर्यवंशी,नीता गुरव, समाधान पवार तसेच जेष्ठ नागरिक सभासद यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या