जळगाव : दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील गंधार कला मंडळातर्फे रविवार,दि.२१ डिसेंबर २०२५ रविवार रोजी मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा आयोजित केली आहे.ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत दुपारी साडेबारा वाजता होईल.स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
लहान गट वय वर्षे ९ ते १४ इयत्ता चौथी ते नववीपर्यंत.पुढील गट खुला असेल. या स्पर्धेत मराठी चित्रपटातील भावगीत,भक्तीगीत, गझल, अभंग, भजन,गवळण असा कोणताही गीत प्रकार गाता येईल.नोंदणी वेळी चित्रपटाचे नाव व गाण्याची ओळ कळवावी.मंडळाकडून वाद्ये व साथीदार उपलब्ध असतील.आपण स्वतःही आणू शकतात.गीताचे फक्त दोनच कडवे गाता येतील.बक्षीस पात्र स्पर्धकांनी बक्षीस वितरणाला हजर राहणे गरजेचे आहे.
मोठ्या गटात स्व.शरद नागराज यांच्या स्मरणार्थ प्रथम १५०१, द्वितीय ११०१, तृतीय ७०१, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे ३०१ रोख देण्यात येईल.तर लहान गटात प्रथम १३०१, द्वितीय ९०१/- तृतीय ५०१/- व उत्तेजनार्थ ३ बक्षिसे भेट स्वरूपात देण्यात येतील.
तसेच दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास स्व. राजाराम देशमुख स्वरगंधार करंडक देण्यात येईल.
लहान गट प्रवेश फी १००/- रुपये,तर खुला गट १५० रुपये आहे.
नोंदणी १९ डिसेंबरपर्यंतच करता येईल. त्यानंतर आलेल्या प्रवेशाचा विचार करता येणार नाही.
नाव नोंदणी- सिद्धांत फडणीस, दुर्गादेवी मंदिरासमोर, बळीराम पेठ किंवा सुचेता नेवे, ओरियन शाळेसमोर निपुण लॅब शेजारी, जळगाव.
बाहेरगावच्या स्पर्धकांनी 9325353198 किंवा विजय महाजन 9890334008 या मोबाईल क्रमांकावर फोन पे ने नोंदणी करावी. नोंदणी केल्यावर स्क्रीनशॉट टाकावा.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
“गंधार”तर्फे स्व.राजाराम देशमुख करंडक..मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा..
RELATED ARTICLES
