Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरखान्देश करा ओके’ हिंदी गीत गायन स्पर्धेचे प्रथमच आयोजन.. चिवास महिला मंडळ...

खान्देश करा ओके’ हिंदी गीत गायन स्पर्धेचे प्रथमच आयोजन.. चिवास महिला मंडळ व युफोरिया यांचा उत्साही उपक्रम..

जळगांव – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)चिवास महिला मंडळ जळगाव आणि युफोरिया (IFRM)संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ‘खान्देश करा ओके’सुपरस्टार हिंदी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आज रोटरी भवन मायादेवी नगर येथील पत्रपरिषदेत देण्यात आली.यावेळी अनघा खारुल,शांता वाणी,नेहा नैनानी, डॉ.सुशिल राणे,संगिता अजनाडकर,तृप्ती बाकरे उपस्थित होते.‘करा ओके’वर अशी नाविन्यपूर्ण स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच घेण्यात येत आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी करा ओके ट्रॅकवर स्वतःच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ दि.६ ऑगस्ट पर्यंत पाठवायचा आहे.यातून ५० स्पर्धकांची निवड केली जाईल.निवड झालेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीत भाग घेता येईल.अंतिम फेरी दि.१७ ऑगस्ट रोजी शहरातील गंधे सभागृहात घेण्यात येईल.स्पर्धकांनी प्रत्यक्ष करा ओकेवर गाणे सादर करावयाचे आहे.यातून विजयी स्पर्धकांना ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात येईल.या स्पर्धा वय वर्षे २१ ते ४० आणि ४१ च्या पुढील सर्व अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.पहिल्या फेरीस प्रवेश फी शंभर तर दुसऱ्या फेरीसाठी चारशे रुपये आहे.अधिक माहितीसाठी संपर्क अनघा खारुल (9421520256), संदीप जोशी (94222796210), नेहा नैनानी (94239149698) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या