
जळगांव – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ऑनलाइन औषध विक्री, बनावट औषध विक्री कडे दुर्लक्ष, कॉर्पोरेट डिस्काउंट यासारख्या दुष्परिणामा विरोधात केमिस्ट बांधवांना न्याय मिळण्यासाठी जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे बुधवार दि.२० मे रोजी जिल्ह्यात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद होती. केमिस्ट बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा भव्य मोर्चा जळगाव शहरात सकाळी दहा वाजता काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली सचिव अनिल झंवर यांच्या मार्गदर्शनाने केमिस्ट बांधवांनी हजारोंच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना या मागण्या संदर्भात संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले व त्याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. अ.भा . औषध विक्रेता संघाच्या आवाहनानुसार या वीस मेच्या बंदच्या आयोजन जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्य व देशभरात करण्यात आले होते.
ऑन लाईन औषध विक्रीतून गोर गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळनाऱ्यांवर कारवाई व्हावी अश्या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांकडे लक्ष वेधणे या हेतूने काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चाने प्रशासनाचे व सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले. केंद्र शासनाच्या अशा दुर्लक्ष करणाऱ्या व ई- फार्मसी तुन देशवासीयांच्या आरोग्यास बाधा आणणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
(जी. एस .आर८१७-२८/८/२०१८) तसेच जी एस आर (२२०- २६/०३/२०२०) ही परिपत्रके केंद्र शासनाने रद्द करावी ही मागणी करत व त्यातून सामान्य नागरिकांचे आरोग्याचे रक्षण व्हावे या दृष्टीने या परिपत्रकांचा निषेध करण्यात आला. जळगाव शहरात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सुमारे१००० तर संपूर्ण जिल्हाभरातील
तालुक्यात ४८०० केमिस्ट बांधव सहभागी झाले.
होते.खान्देश मॉल येथून भव्य मोर्चाला प्रारंभ..महिला केमिस्ट सदस्य उत्स्फूर्त सहभाग
सकाळी १० वाजता खान्देश मॉल येथून निषेध मोर्चाला प्रारंभ झाला .शहरासह तालुक्यातील केमिस्ट बांधव पांढरा शर्ट, काळी पँट, काळी टोपी या वेशात मोर्चात सहभागी झाले.महिला केमिस्ट सदस्य देखील सहभागी झाले होते.ई – फार्मसी धोरणाचा निषेध करणारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा या मोर्चातून काढण्यात आली होती. केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत नेहरू चौक , टॉवर चौक,चित्रा चौक , शिवतीर्थ मैदान मार्गे स्टेट बँक स्वातंत्र्य चौक,मार्गे मार्ग क्रमण करीत ११ वाजता हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला
प्रसिध्दी माध्यमांनी घेतली दखल..जाणून घेतली बंद मागची पार्श्वभूमी…..
.दरम्यान स्टेट बँक चौकात प्रसिध्दी माध्यमांनी (मीडिया ) या बंद बाबत संघटनेची भूमिका जाणून घेतली जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी यावेळी परखड शब्दात माध्यम प्रतिनिधींना सविस्तर माहिती देत प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या नंतर प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी रोहन घुगे,प्रशासन अधिकारी वैशाली चव्हाण यांना जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे प्रमुख मागण्यांचे निवेदन जिलाध्यक्ष सुनिल भंगाळे सचिव अनिल झंवर , तालुकाध्यक्ष समीर गुळवे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
जिल्हा संघटनेतर्फे दिलगिरी व्यक्त …
आजच्या एक दिवसीय बंद मुळे सामान्य नागरिक,तसेच रुग्णालये ,यांना औषध उपलब्ध होण्यासंदर्भात जो त्रास सहन करावा लागला त्या साठी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
अ.भा. औषध विक्रेता संघाच्या आवाहनानुसार जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या भव्य निषेध मोर्चा, व जिल्हाभरात बंद आयोजन यशस्वी करण्या कामी जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सेक्रेटरी – अनिल झंवर,कोषाध्यक्ष शामकांत वाणी पदाधिकारी ब्रजेश जैन, दिनेश मालु ,नरेश मंधान, लखीचंद जैन,रूपेश चौधरी, साकिर चित्तलवाला,खालीद सैय्यद तालुकाध्यक्ष समीर गुळवे ,महिला केमिस्ट अश्विनी पाटील ,
नीलिमा बोरोले,वर्षा माळी, विलास बरडे – तालुकासचिव,दिपक चौधरी,निलेश नाईक
,साहेबराव भोई, कीशोर बारी,भुषण महाजन ,शकील शेख ईलीयास बागवान, नंदु पाटील, बाळकृष्ण सोनवणे स्वप्नील रडे,डिगु भंगाळे, केतन सोनवणे, राहुल जगताप यांचेसह इतर पदाधिकारी .
