Friday, June 12, 2026
Homeजळगांव शहरआ सुरेश भोळे(राजू मामा) वाढदिवसानिमित्त सामाजिक व लोक जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन..

आ सुरेश भोळे(राजू मामा) वाढदिवसानिमित्त सामाजिक व लोक जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन..

जळगांव दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सर्वसामान्य जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व आ सुरेश भोळे राजू मामा यांच्या उद्या दि १३ जुन रोजी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने वृक्षारोपण,रक्तदान,अन्नदान,शालेय साहित्य वह्या वाटप ,फळ वाटप,अशा विविध उपक्रमांनी वाढदिवस जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी महापौर दीपमाला काळे सभापती डॉ चंद्रशेखर पाटील गटनेते प्रकाश बालाणी ,सभागृह नेते नितीन लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सर्वप्रथम सकाळी ८:३०वा. मंडल क्र.३ तर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.श्री.स्वामी समर्थ केंद्र, शारदा आश्रम शाळेजवळ (जितेंद्र चव्हाण मंडल क्र. १ वृक्षारोपण शिवाजीनगर पुलाजवळ (राजेंद्र मराठे) सकाळी ०९:असोदा रोड, बहिणाबाई नगर (दिपक कोळी) सकाळी ०९:१५ आरोग्य शिबीर जुने जळगाव (मिलिंद चौधरी) सकाळी ०९:४५ व सकाळी १० वा .युवा मोर्चा पांजरापोळ गोशाळा येथे गाईंना चारा वाटप मंडल क्र.२ येथे नानीबाई शाळे जवळ अंध व अपंग शाळा येथे फळवाटप महापौर दीपमाला काळे तर्फे करण्यात येईल सिव्हील हॉस्पिटल येथे अन्नदान व फळवाटप मंडल क्र. 3 सरदार वल्लभभाई पटेल तर्फे संत गाडगे बाबा निराधार केंद्र भजे गल्लीत अन्नदान मंडळ अध्यक्ष अजित राणे तर्फे मंडल क्र. २ तर्फे रिमांड होम येथे जेवण नगरसेविका अंकिता पाटील रिमांड होम येथे विद्यार्थ्यांना कपडे वाटप.चेतन तिवारी, राहुल लोखंडे दुपारी १२:०० वा. महिला मोर्चा तर्फे वाहतूक पोलीस यांना पाणी व थंड पेय वाटप,मंडल क्र.४ तर्फे मालवाहतूक रिक्षा स्टोप,सिंधी कॉलनी अध्यक्ष विनोद मराठे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मंडल क्र.४ तर्फे रक्तदान शिबीर (श्री दत्त मंदिर सदगुरूनगर येथे) (प्रभाग क्र १६ नगरसेवक) संध्या.६ वा.मंडल क्र.५ तर्फे पिंप्राळा हुडको येथे लाडू व बिस्कीट वाटप करण्यात येणार आहे संध्या ६:३० वा सफाई महिला कामगार यांना साडी वाटप नितुताई परदेशी, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा तसेच श्री राजू मामा भोळे मित्रपरिवार, यांच्यातर्फे सुद्धा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी विविध आघाड्यांचे अध्यक्ष नगरसेवक बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते यांनी वरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भारतीताई सोनवणे नितीन इंगळे,जयेश भावसार ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या