Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरआषाढी एकादशी निमित्त ‘अवघे गर्जे पंढरपूर’ भक्तिसंगीताचा कार्यक्रम

आषाढी एकादशी निमित्त ‘अवघे गर्जे पंढरपूर’ भक्तिसंगीताचा कार्यक्रम

जळगाव, दि. २३ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) – आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने स्वरवेध फाउंडेशनतर्फे दि.२५ जुलै (शनिवार) रोजी सायंकाळी भाऊंच्या उद्यानात ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या संकल्पनेवर आधारित अभंगवाणी व भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात भागवत पाटील,मोहन रावतोळे,सौ. अंजली धुमाळ यांच्यासह इतर गायक-गायिका विठ्ठलभक्तीने ओतप्रोत अभंग व भक्तिगीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन ज्योती राणे-पाटील करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य व खुला असून, आषाढी एकादशीचा भक्तिमय आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पावसाची शक्यता असल्यास कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील उंच पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्वरवेध फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या