जळगांव दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)संस्कार भारती तर्फे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यात आपल्या प्रभावी वाणीतून गुरूंच्या सानिध्यात आयुष्यातील प्रत्येक दिवस हा उत्सव होत असतो.आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर अध्यात्मिक गुरुची आवश्यकता असते.असे संस्कार भारती तर्फे”गुरुपौर्णिमा”या विषयावर झालेल्या कीर्तनात ह.भ.प.डॉ.सौ.विशाखा जोशी यांनी कथन केले.
हिरा शिवा कॉलनीतील विठ्ठल मंदिरात गुरुमहिमा या विषयावर किर्तन संपन्न झाले.सुरुवातीला अध्यक्ष सुभाष महाले,अनिल पाटील यांनी व्यास पूजन केले. त्यानंतर ह.भ.प.डॉक्टर विशाखा जोशी यांनी सद्गुरूंचा महिमा सांगून उपस्थितांना खिळवून ठेवले.त्यांना तबला संगत निळकंठ कासार तर हार्मोनियम संगत दिलीप चौधरी यांनी केली.
सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले. तर आभार संपदा छापेकर यांनी मानले. भगवंत फडणीस,भागवत पाटील,अर्जुनबाबा पाटील, दीपक अट्रावलकर,दुष्यंत जोशी,भरत लढे यांनी सहकार्य केले.यावेळी रसिकश्रोते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर अध्यात्मिक गुरुची आवश्यकता – डॉ.सौ.विशाखा जोशी
RELATED ARTICLES
