जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
१९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात,भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीस संघर्ष करणाऱ्या १७५ सत्याग्रहींचा काल दि.२५ रोजी जिल्हा प्रशासनामार्फत भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात आणीबाणीच्या तत्कालीन खडतर परिस्थितीत कार्यात,संघर्षात झोकून देत एका विशिष्ठ ठाम विचाराने प्रेरित होवून सहभागी असलेले जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री.सतीश मदाने यांना सन्मानपत्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते देवून त्यांचा सहभागाचा गौराव करण्यात आला.
या प्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद,आमदार श्री राजूमामा भोळे,आयुक्त तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे,जिल्हा परिषदेचे सीईओ श्रीमती मीनल करनवाल यांची विशेष उपस्थिती होती.सर्व स्तरातून जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांचे या विशेष सन्मानाने गौरवित झाल्याने अभिनंदन होत आहे.
आणीबाणीत सहभागी जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांचा शासनातर्फे सन्मानपत्र देवून गौरव..
RELATED ARTICLES
