जळगाव, दि. २५.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव,ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार श्री.सुरेश भोळे (राजूमामा),जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,निवासी उप जिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे,मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी व अजित मेंडकी,उदय भालेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. सुरेश भोळे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील १७५ व्यक्ती आणीबाणीच्या लढ्यात होती. यातील हयात असणाऱ्या अनेकांनी मंचावर येऊन गौरव स्विकारला, दिवंगत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी हा गौरव स्विकारला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.त्यात त्यांनी या कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. 
आणीबाणीत सहभागी असलेल्या १७५ जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव.. लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
RELATED ARTICLES
