जळगांव- दि.१८ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय कश महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आज गुरुवार दि.१८ रोजी रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने प्रत्येक योगाला निश्चित नियोजन प्रमाणे आचार्य श्रीराम शर्मा धर्मार्थ दवाखाना गायत्री मंदिर,विसनजी नगर येथे मोफत सुवर्णप्राशन डोस देण्यात आला.तसेच त्वचाविकार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.एकूण सुवर्णप्राशनाचा १७४ मुला मुलींना या योजनेचा लाभ मिळाला .तसेच एकूण ८ त्वचाविकार रुग्णांनी तपासणीचा विनामूल्य लाभ घेतला.
जळगाव तालुक्यातील जवळपास १७४ मुलांना डोस देण्यात आलेला आहे,दुपारी दोन वाजेपर्यंत तिथे जळगाव येथील होमिओपॅथी कॉलेजची सर्व टीम उपलब्ध होती.जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे ,सचिव अनिल झंवर यांचेसह सर्व केमिस्ट बंधू भगिनी तसेच कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरा तील लहान मुलांना हा डोस घेण्यासाठी प्रचार प्रसार करून प्रयत्न केले.हा डोस विनामूल्य देण्यात येत असतो,शासकीय होमिओपॅथिक कॉलेज जळगाव,शासकीय आयुर्वेद कॉलेज यांच्या सौजन्याने हे आयोजन यशस्वी होत आहे..सर्व केमिस्ट पदाधिकारी,कार्यकर्ते या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आचार्य श्रीराम शर्मा धर्मार्थ दवाखाना गायत्री मंदिर,विसनजी नगर येथे मोफत सुवर्णप्राशन डोस तसेच त्वचाविकार रुग्णांची मोफत तपासणी
RELATED ARTICLES
