जळगाव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
अमृत संस्था जळगावच्या मोघे संकुल स्थित कार्यालयात बाजीराव पेशवा ३६३ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती बाजीराव पेशवा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी बाजीराव पेशवा यांच्या पराक्रमाची व शौर्यगाथेची आठवण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाला पुढे नेण्यात बाजीराव पेशवा यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे तसेच पराक्रमामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार झाला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी ब्रह्मश्री संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ, विद्यमान अध्यक्ष कमलाकर फडणीस,विजय मोघे, धर्मसाथी संपादक प्रसाद जोशी,ज्येष्ठ कवी अशोक जोशी, डॉ.निलेश राव, जळगाव अमृत संस्थेचे कार्यालय प्रमुख राजेंद्र कानडे,सहाय्यक प्रज्योत कुळकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी संस्थेच्या माध्यमातून समाजात ऐक्य, संघटन आणि सेवा या मूल्यांना अधिक बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अमृत संस्था जळगाव कार्यालयात बाजीराव पेशवा जयंती उत्साहात साजरी.
RELATED ARTICLES
