Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरअमळनेरकर महाराज सेवा समिती जळगाव तर्फे ५ कुंडी गणेश याग, प्रवचन,...

अमळनेरकर महाराज सेवा समिती जळगाव तर्फे ५ कुंडी गणेश याग, प्रवचन, कीर्तन सोहळा..

जळगाव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील अमळनेरकर महाराज सेवा समितीतर्फे शिरसोली रोडवरील सुदर्शन हॉल येथे १९ ते २१ मे या कालावधीत ५ कुंडी गणेश याग, प्रवचन व कीर्तन अशा विविध आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुरुषोत्तम मास अर्थात अधिक महिन्या निमित्त सद्गुरु श्री संत सखाराम महाराज (पू. श्री प्रसाद महाराज) यांच्या प्रेरणेने आणि तीनही दिवस त्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.मंगळवार १९ व बुधवार २० मे रोजी सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत गणेश याग व दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार २१ मे रोजी गणेश याग सकाळी साडेसात वाजता प्रारंभ होऊन दुपारी १२ वाजता सद्गुरु पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता पूर्णाहुती व दुपारी २ वाजता महाप्रसादाचे वितरण होणार आहे.तीनही दिवसात सकाळी १० ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ह. भ. प. प्रसाद महाराज यांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.गणपती अथर्वशीर्ष अस्थिरतेकडून स्थिरतेकडे या विषयावर मंगळवार १९ व बुधवार २० रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील धनंजय गोखले यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी (पटवारी) यांचे मंगळवार १९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता कीर्तन होणार आहे.बुधवार २० मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील समर्थभक्त गणेश विनायक रामदासी यांचे सकाळी साडेसात वाजता किर्तन आणि सकाळी दहा वाजता काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.या गणेश याग स्थळाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले असून यशस्वीतेसाठी विविध समित्यांच्या माध्यमातून भाविक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या