Thursday, October 29, 2026
Homeकेमिस्ट विश्व..अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...

अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे जिल्हा केमिस्ट संघटना वतीने स्वागत .. ऑनलाईन फार्मसी व्यवसाय बंद करण्याबाबत निवेदन.

जळगांव -; दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगावात निघालेल्या आदिवासी मोर्चातील सहभागी बांधवांना भेटी साठी जळगावात आलेल्या  महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे जिल्हा केमिस्ट संघटना वतीने स्वागत करण्यात आले तसेच केमिस्ट बांधवांना आद्य स्थितीत होत असलेल्या अडी अडचणी समस्या निवेदन देवून मांडण्यात आल्या.पद्मालय शासकीय विश्रामगृहात दुपारी जिल्हा केमिस्ट संघटना पदाधिकारी व अन्न औषध प्रशासन अधिकारी प्रशांत अस्वार यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे स्वागत केले.जिल्हा व तालुका केमिस्ट पदाधिकारी सचिव अनिल झंवर,कार्याध्यक्ष समीर गुळवे, विलास बरडे,अमित चांदीवाल,वैभव तायडे,खालीच सय्यद,शाकीर चित्तलवाल बाळू सोनवणे भूषण महाजन, नंदू पाटील ,किशोर बारी,इल्यास बागवान,निखिल वाणी,मयूर पाटील कुंदन बोरसे संजय तिवारी आदी.या प्रसंगी उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी राज्यात सद्य स्थितीत अडचणीत आलेल्या केमिस्ट व्यवसाय त्या संधर्भातीलील अडी अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.तसेच त्यांना ऑनलाईन पद्धतीने केमिस्ट व्यवसायावर ओढवलेल्या संकटाची तसेच अन्य समस्यांची माहिती देत तो व्यवसाय शासनाने बंद करण्या बाबत  मंत्री महोदयांना निवेदन दिले.अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी या बाबत लक्ष घालून केमिस्ट व्यवसाय हित जोपासले जाईल या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलले जाईल असे सांगून केमिस्ट बांधवांना आश्वस्थ केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या