Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरअध्यापक प्रबोधिनी अंतर्गत शिक्षणतज्ञ प्रा. शरच्चंद्र छापेकर यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत शिक्षणतज्ञ प्रा. शरच्चंद्र छापेकर यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

जळगांव – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत विद्यासमिती प्रमुख तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री.शरच्चंद्र छापेकर यांच्या हस्ते प्रथम पुष्प उद्‌घाटन करण्यात आले.या प्रसंगी समन्व‌यिका श्रीमती रजनी पाठक, मुख्याध्यापिका सौ.सुषमा साळुंखे,सौ.उषा बाविस्कर, सौ.रेखा चंद्रात्रे,सौ.अर्चना मुळे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रा.शरच्चंद्र छापेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरु-शिष्य परंपरा,शिक्षकाची काळानुरूप बदलती भूमिका,शाळा व संस्थेची उज्ज्वल परंपरा, शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया,शिक्षकांच्या अंगी असणारी कौशल्य, विनोबा भावे यांनी सांगितलेली ज्ञान निष्ठा, समाज निष्ठा,आत्म निष्ठा इ.बाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली बडगुजर यांनी केले. आभार सौ. सुवर्णा देशमुख यांनी मानले. समन्वयिका श्रीमती रजनी पाठक यानी मनोगत व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या