Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरअत्रे प्रतिष्ठानतर्फे रविवारी पुरस्काराचे वितरण जयंतीदिनाचे औचित्य : न्या.संजय गंगापुरवाला यांची...

अत्रे प्रतिष्ठानतर्फे रविवारी पुरस्काराचे वितरण जयंतीदिनाचे औचित्य : न्या.संजय गंगापुरवाला यांची उपस्थिती..

जळगाव – दि २७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील गुरुवर्य अ.वा.अत्रे प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवार दि.२९ जून रोजी ज्येष्ठ विधिज्ञ स्व.अच्युतराव अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून‘अग्रणी’पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ॲड.सुशील अत्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.
ॲड.सुशील अत्रे यांनी सांगितले की,प्रतिष्ठानच्या वतीने ॲड.स्व.अ.वा.अत्रे यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचावे या उद्देशाने या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.विधी व न्याय,शैक्षणिक या दोन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.यावर्षी विधी व न्याय क्षेत्रात कार्यरत ॲड.व्ही.एन.आगाशे (ठाणे)यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.स्मृतीचिन्ह,चांदीचा शिक्का,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार निवृत्त न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्य न्यायमूर्ती मा.श्री.मद्रास उच्च न्यायालय संजय गंगापूरवाला,औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मा.श्री. किशोर संत,मा.श्री.पद्मश्री उज्वल निकम यांची उपस्थिती लाभणार आहे.७ सदस्यीय समितीद्वारे पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.राज्यस्तरावर दरवर्षी यंदापासून हा पुरस्कार विधी व न्याय,शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणार आहे.या निवड समिती मध्ये शि.प्र.मंडळाचे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,प्रा.अनिल राव,माजी कुलगुरू पंडित विद्यासागर तसेच कायदा विभागातून पद्मश्री उज्वल निकम एडवोकेट जयंत जायभावे,माजी न्यायमूर्ती साधना जाधव,ऍड.मीरा खडककर यांचा या निवड समितीत कायमस्वरूपी समावेश आहे.दि.२९ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील गंधे सभागृहात हा सोहळा होणार असून नागरिकांनी उपस्थिती द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने ॲड.सुशील अत्रे यांनी केले आहे.या पत्रकारपरिषदेला प्रा.शरदचंद्र छापेकर,अनिल कांकरिया,श्री.महेंद्र लुंकड,ॲड.अशोक माथुर वैश्य,अभिजीत देशपांडे तसेच अत्रे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या