Wednesday, April 15, 2026
Homeताज्या बातम्याह.भ. प. श्रीराम महाराज यांचे पंढरीच्या वारी दरम्यान श्री क्षेत्र नेवासा येथे...

ह.भ. प. श्रीराम महाराज यांचे पंढरीच्या वारी दरम्यान श्री क्षेत्र नेवासा येथे कीर्तन..

जळगांव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
श्री.क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रे करिता जळगाव येथून श्री संत मुक्ताबाई पालखीचा १४ वा.मुक्काम श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी जन्मस्थान श्री. संत ज्ञानेश्वर मंदिर,श्री. क्षेत्र नेवासे येथे दि.२३ जून दिनी ह.भ.प.श्री.श्रीराम महाराज यांचे भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी!! कृपा करी हरी तयावरी !! या अभंगावर कीर्तन होऊन क्षीरापत अभंग होऊन प्रसाद वाटण्यात आला.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.समस्त वारकरी मंडळीनी भगवान श्री मोहिनीराज व श्री संत ज्ञानेश्वरी खांबाचे दर्शन घेतले तसेच समस्त वारकरी मंडळीची भोजन व्यवस्था डॉ.देशमुख परिवार यांनी केली.पालखी दुसर्‍या दिवशी पहाटे वडाळा गावाकडे प्रस्थान झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या