Tuesday, April 14, 2026
Homeजळगांव शहरअभियंता पतपेढी वाचन कट्टा तर्फे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम

अभियंता पतपेढी वाचन कट्टा तर्फे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम

जळगांव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अभियंता पतपेढी वाचन कट्टा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभियंता भवन महाबळ रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला वाचक, सभासदांचा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर साहेबराव पाटील यांनी केली,त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. बाबासाहेबांचे पुस्तक प्रेम,अर्थतज्ञ म्हणून रिझर्व बँकेच्या स्थापने मागे महत्त्वपूर्ण योगदान, जलनियोजन,मूकनायक वर्तमानपत्र, बाबासाहेबांचे त्या काळातील ट्रेडिंग संदर्भात कार्य इत्यादीबद्दल सखोल माहिती दिली.प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी प्रसिद्ध रंगकर्मी शंभू पाटील यांचे हस्ते झाले याप्रसंगी संत सेना महाराज यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, शंभू पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले ,संत सेना महाराज यांच्या कार्यासंदर्भात माहिती इंजिनिअर साहेबराव पाटील यांनी दिली,कवी प्रकाश पाटील यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांवर स्वलिखित कविता सादर केली त्यांच्या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक हेमंत पवार यांनी केले,कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली,उपस्थितांमध्ये संचालक इंजिनीयर ब्रह्मानंद तायडे, इंजिनीयर सचिन पाटील,तसेच इंजिनिअर संजय सोमानी, इंजिनीयर शुभम पाटील,इंजिनीयर उल्हास राणे,इंजिनियर सूर्यकांत हिवरकर ,अभियंता  शेषराव पाटील,अभियंता पी एस पाटील,अभियंता  मनोहर तायडे,निवृत्ती सूर्यवंशी, ॲड.विजय शर्मा,भास्कर पाटील,एच आर चकले,के डी भोईटे,मालोजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजिनियर सूर्यकांत दत्तात्रेय पाटील तसेच सचिव राजेंद्र पाटील,कृष्णा पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या