Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरचेक पोस्ट,पेट्रोलिंग, गतिरोधक, वेग-मर्यादेबाबत प्रशासनाने लक्ष वाढवण्याच्या मागणीसह जिल्हाधिकाऱ्यांना केमिस्ट संघटनेचे निवेदन...

चेक पोस्ट,पेट्रोलिंग, गतिरोधक, वेग-मर्यादेबाबत प्रशासनाने लक्ष वाढवण्याच्या मागणीसह जिल्हाधिकाऱ्यांना केमिस्ट संघटनेचे निवेदन सादर…

१९ जून रोजीच्या शहरातील हिट अँड रन प्रकरणी सखोल चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी-जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे….जळगांव – दि.२३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरात १९ जून रोजीच्या घटनेत हिट अँड रन प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जावी तसेच वर्दळीच्या अधिक वापर असलेल्या चौकात चेक-पोस्ट, पेट्रोलिंग, गतिरोधक व वेगमर्यादेबाबत प्रशासनाने जागरूक होऊन लक्ष वाढवावे अशा मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हा केमीस्ट संघटनेतर्फे केमिस्ट बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत आज दिनांक २३ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कडे सादर केले.याप्रसंगी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे सचिव अनिल झवर,कोषाध्यक्ष शामकांत वाणी,उपाध्यक्ष कनकमल राका,ब्रजेश जैन, दिनेश मालू,लखीचंद जैन,नरेश मंधन,समीर गुळवे, साकिरभाई चित्तलवाला,जितेंद्र जोशी,भूषण चौधरी, विलास बर्डे,बाळूभाऊ सोनवणे,अमित चांदीवाल,दिनेश चौधरी,राजेंद्र चौधरी,मनोहर निकम,वैभव तायडे, अविनाश बुधवानी,मनीष अत्तरदे,निलेश पाटील, विलास नेहते,नंदू पाटील,कुंदन बोरसे,सुदाम वाणी, सुरेश पाटील,राहुल जगताप,मुस्तकीम शेख,रवी रडे,यांचे सह मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते.
या पुढे अश्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे अन्यथा बंद आंदोलन पुकारणार…-सुनील भंगाळे..

या निवेदन देण्या प्रसंगी माध्यमांसमोर जळगाव जिल्हा केमीस्ट संघटनेची भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले की जळगाव शहरातील कायदा व्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे ज्येष्ठ नागरिक, महिला,लहान मुले,विद्यार्थी,पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे त्यांचे कडे रस्त्याने चालताना खात्रीशीर सुरक्षेचा कोणताही पर्याय नाही..दि.१९ जून रोजीच्या हिट अँड रन घटनेत आमच्या केमिस्ट बांधवाची(सुनील गुजराथी)यांच्या पत्नी सौ.वंदना गुजराथी चौकातून एका बाजूने पायी चालत असताना मद्यधुंद चालकाने अतिशय वेगाने व बेजबाबदार पणाने वाहनाची धडक देत त्यांना चिरडले.चांगल्या सुखी कुटुंबावर दुर्दैवी वेळ आणली,अशा अनेक घटना घडत असून कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहे.प्रशासन ढिम्मपणे उघड्या डोळ्यांनी पहायची भूमिका बजावत आहे हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने जळगाव शहरात प्रत्येक वर्दळीच्या अधिक वापर असलेल्या चौकात चेक पोस्ट गतिरोधक पेट्रोलिंग तसेच वेग मर्यादेबाबत जागरूकता वाढवून गांभीर्याने लक्ष घालावे तसेच सायंकाळनंतर पेट्रोलिंग ची व्यवस्था सदर वर्दळीच्या भागात करावी जेणेकरून सुरक्षितता वाढीस जाईल आमच्या निवेदनातील मागण्यांचा विचार न झाल्यास जळगाव जिल्हा केमिस्ट संघटना बंद आंदोलन शांततेच्या मार्गाने पुकारून प्रशासनाचा जाहीर निषेध करेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या