जळगांव – दि.२३.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील महाबळ परिसरात केमिस्ट बांधव श्री सुनील गुजराथी यांच्या पत्नीचे अपघाती निधन झाले.ज्या व्यक्ती मुळे त्यांना आपले प्राण गमवावा लागला त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी तसेच घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कडक कारवाई व्हावी या मागणी साठी जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आज सोमवारी दि.२३.६.२५ रोजी सकाळी ११ वाजता केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सर्व केमिस्ट बांधव आज सकाळी ठिक १०.३० वाजता सुनील मेडिकलला निवेदन देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे,सचिव अनिल झवर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील सर्व केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी,कार्य.सदस्य,तालुका कार्यकारिणी ,झोनप्रमुख व केमिस्ट बांधव जिल्हाधिकारी यांना सादर घटनेबाबत निवेदन देण्यासाठी सहभागी होणार आहे.
जळगांवातील हिट अँड रन घटनेची सखोल चौकशी व कारवाई साठी आज जिल्हा केमिस्ट संघटना देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
RELATED ARTICLES
