भुसावळ – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) नंदलाल मिलकीराम मकडीया,धंदा-व्यापार रा.सिंधी कॉलनी,भुसावळ यांचे गायत्री नगर मधील राजस्थान मार्बलचे बाजुला असलेले पत्राचे गोडावुनचे शटर उचकवुन अज्ञात चोरट्यांनी गोडावुनचे आत प्रवेश करुन फिर्यादी यांचे गोडावुन मधील इलेक्ट्रॉनीक वस्तु फ्रिज,वाशिंग मशीन,ए सी, इल.ई.डी.टिव्ही असा एकुण ३५,००,०००/-रु किमतीचा मुद्देमाल हा चोरी करुन नेल्या बाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सि.सि.टि.एन.एस.गु.र.नं.२९५/२०२५ भा.न्या.सं.
कलम ३०५ (अ),३३१(३),३३१(४) प्रमाणे दिनांक १७/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१५ रोजी ६.०० वा.ते दि.१६ जुनचे ८.४० वा.दरम्यान सदर चोरीची घटना घडली.
तपासा दरम्यान वरिष्ट आधिकरी यांच्या आदेशाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच स्था गु शा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पथक हे समांतर तपास करीत असतांना गुन्ह्याचे गेले मालाच्या ठाव ठिकाणाबाबत तांत्रीक विष्लेशणाद्वारे व गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीची खात्री केली असता सदरचा मुद्देमाल हा शिरपुर शहरातील करवंद रोड,महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्राचे गोडावुन मध्ये ठेवलेला असल्याचे व तो वरिल गुन्ह्यातील असल्याचे सदर पथक यांना तपासात निष्पन्न झाले.त्यानंतर सदरचा मुद्देमाल पोलीस पथकाने पंचा समक्ष योग्य तो पंचनामा करुन एकुण १८,८०,०००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त केला आहे. व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा ज्या खाजगी गोडावुन मध्ये ठेवण्यात आलेला होता त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद वय ४८ रा.न्यु बोराडी ता.शिरपुर ह.मु.गणेश कॉलनी,आर.सी.पटेल उर्दु शाळे जवळ शिरपुर, जफर शेख मुजावर, वय २४ रा.मुजावर मोहल्ला शिरपुर ता.शिरपुर जि.धुळे अश्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री.कृष्णात पिंगळे,स्था.गु.शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कार्यालय येथील पो.हे.कॉ उमाकांत पाटील,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ विजय नेरकर,पो.हे.कॉ संदीप धनगर,पो.शि.सचिन चौधरी,पो.शि.प्रशांत परदेशी,पो.शि.योगेश माळी,पो. शि.अमर अढाळे,पो.शि.प्रशांत सोनार,पो.शि.भुषण चौधरी,पो.शि.राहुल वानखेडे,पो.शि.जावेद शहा,स्था. गु.शाखा पथक पो.उप.निरी.शेखर डोमाळे,सहा. फौज.रवी नरवाडे,पो.हे.कॉ गोपाळ गव्हाळे,पो.हे. कॉ.मुरलीधर धरगर,पो.हे.कॉ संदीप चव्हाण,पो.हे. कॉ.प्रविण भालेराव,चालक भरत पाटील,भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.महेश चौधरी,पो. शि.राहुल भोई अश्यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचातपास पोलिस निरीक्षक राहुल टि वाघ,भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.हे करीत आहेत.
भुसावळ येथे ३५ लाखाच्या इले.वस्तू चोरीतील १८.८० लाखाचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांची प्रभावी कामगिरी..
RELATED ARTICLES
