जळगांव – दि.१८(धर्म साथी मीडिया नेटवर्क) जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात(रामपेठ),जुने जळगाव येथे श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमाने ह.भ.प.वै.पुष्पाई बाळकृष्ण महाराज जोशी यांचे पंचम मासिक पुण्यतिथी निमित् आज बुधवार दि.१८ जून सायंकाळी ५ वाजता मोरया भजनी मंडळ (मारुती पेठ,जुने जळगाव)चे भजनाचा कार्यक्रम तसेच लगेच संध्याकाळी ६ ते ७ वाजता सौ.तृप्ती बाकरे,जळगाव यांचे झाशीची राणी लक्ष्मीबाई चरित्रा वर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भाविकांनी भजन व व्याख्यान श्रवणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन सौ.रश्मी जोशी व श्रीराम मंदिर संस्थानने केले आहे.
श्रीराम मंदिर संस्थानात आज भजन व व्याख्यानाचे आयोजन..
RELATED ARTICLES
