जळगांव दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) राज्यातील माध्यनिक व उच्थ माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांची पदभरतीला शासनाने संच मान्यतेचे कारण देवून स्थगिती दिली आहे.शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले असून तब्बल २० वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीला मिळालेली संधी शासनाने पुन्हा हिरावून घेतल्याने शिक्षण संस्था व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे.
हे अन्यायकारक परिपत्रक शिक्षक संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक २८ मे २०२५ रोजी काढलेले आहे. सदर शिक्षकेतर पद भरती बाबत काढलेले पत्रक त्वरीत रदद करुन पद भरती सुरु करण्यात यावी. माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकिय कर्मचा-यांप्रमाणे पुर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करण्यात यावा.माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा १०,२०,३० वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा.
माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना पवित्र प्रणालीतून वगळून विनाअट शिक्षका पदांवर वेतनश्रेणीत पदोन्नती देण्यात यावी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची पदे कंत्राटी पध्दतीने न भरता ती पूर्वीप्रमाणे शासन नियुक्त मान्यताप्राप्त असावी अश्या मागण्यांचे निवेदन जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने आज दि.१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना देण्यात आले.
त्यानंतर शिक्षक संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक २८ मे २०२५ रोजी शिक्षकेतर पद भरती बाबत काढलेले पत्रकाची होळी करण्यात आली.
यावेळी जळगांव जिल्हा अध्यक्ष योगेश भोईटे, जिल्हा सचिव संदिप डोलारे,उपाध्यक्ष संभाजी अस्वार, दिलीप चौधरी,श्रीमती वैशाली महाजन, श्रीमती ब्रम्हाणी काशिनाथ तायडे,रविंद्र नानाजी पाटील, सहसचिव नितीन पाटील,गोरख सुर्यवंशी,कार्याध्यक्ष विजय पवार दिगंबर पाटील,लक्ष्मण जाधव,रामकृष्ण मोरे,संदिप पवार,स्वप्निल पाटील,इश्वर चव्हाण,विवेक.सी.चौधरी शरद वाघ,संजय कुळकर्णी,संजय देसले,नंदलाल भावसार,महेद्र पाटील,सुनिल पाटील,पांडुरंग पाटील, सोपान महाजन,यावल तालुका अध्यक्ष गणेश पाटील, अजित पाटील,परशुराम महाजन,अमित भोईटे,गणेश रोकडे, आदी मोठ्या संख्येने शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
