जळगाव-दि.१२(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)आपण केलेले रक्तदानाने कोणाला तरी जिवनदानाचे गिप्ट मिळते आणी म्हणूनच जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे डोनेट ब्लड अँन्ड गिप्ट लाईफ मोहीमेअंतर्गत १४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त तसेच १५ जून राष्ट्रीय सर्जन डेच्या पुर्वेसंध्येला रक्तदान शिबिराचे उत्स्फूर्त आयोजन केले आहे.
सर्जन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य चॅप्टर व जळगाव सर्जीकला सोसायटी आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संयुक्त उपक्रमातून राष्ट्रीय सर्जन डे आणि रक्तदा दिनानिमीत्त १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरात ९-१५ जून या आठवड्याचा शल्यचिकित्सक सप्ताह म्हणून अनुष्ठान होतो.यामध्ये सर्जीथॉन,फ्री हेल्थ कॅप्स,ब्लड डोनेशन,वृक्षरोपण,कार्यशाळा,मंचन,वरिष्ठांचा सत्कार आदी उपक्रमांचा समावेश असतो.या आणिअशा अनेक उपक्रमांमुळे आपल्या स्थानिक समाजात आरोग्य-जागरूकता फुलते,शल्यचिकित्सकांचे योगदान दृश्यमान होते.आणि सार्वजनिक आरोग्य सेवेची मजबूत भावना निर्माण होते.आणि म्हणूनच जळगाव सर्जिकल सोसायटी तर्फे शिबिर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय,जळगांव खुर्द येथील रक्तपेढीमध्ये १४ जुन रोजी हे शिबिर आयोजीत केले असून या शिबिरात स्वयंसेवी संस्था,व्यक्ती यांनी सहभाग नोंदवून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरात सहभागी होणा-या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
डोनेट ब्लड अँन्ड गिप्ट लाईफ मोहीम अंतर्गत जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे १४ जून रोजी रक्तदान शिबीर
RELATED ARTICLES
