Monday, February 23, 2026
Homeअमळनेर परिसर..रामदास आयुर्वेदिक फार्मसीतर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी वारीला आर्यूवेदिक औषध सामुग्री भेट..

रामदास आयुर्वेदिक फार्मसीतर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी वारीला आर्यूवेदिक औषध सामुग्री भेट..

जळगाव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)येथील आयुर्वेदिक औषध क्षेत्रात सुप्रसिद्ध रामदास आयुर्वेदिक औषधी भांडारच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम राबवत अमळनेर ते पंढरपूर श्री संत सखाराम महाराज संस्थानाच्या पायी वारीला वारकऱ्यांचे आरोग्य रक्षण होण्या दृष्टीने मोफत विष्णु प्रॉडक्ट्सची आयुर्वेदिक औषध सामुग्री आज भेट देण्यात आली.या प्रसंगी रामदास आर्युवेदिक औषधी भांडारचे संचालक निलेश शरद पाठक यांनी श्री संत सखाराम महाराज संस्थानात भेट देवून संस्थान व वारी प्रमुख प.पू.श्री.प्रसाद महाराज यांचेकडे ही सामुग्री सुपुर्द केली.तसेच त्यांना भेट दिलेल्या औषधांची व विष्णू प्रॉडक्ट्सच्या रामदास आयुर्वेदिक उत्पादनांची माहिती दिली.

दरवर्षी हा सेवाभावी उपक्रम रामदास आयुर्वेदिक औषधी भांडार तर्फे राबवला जात असतो त्यात जळगाव व अमळनेर पायी वारीला सहभागी वारकऱ्यांसाठी औषध सामुग्री भेट म्हणून दिली जाते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या