Friday, May 29, 2026
Homeजळगांव शहरराज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजनांच्या वाढदिवसा निमित्त शित् शवपेट्यांचे सौ.साधनाताईंच्या शुभहस्ते लोकार्पण.....

राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजनांच्या वाढदिवसा निमित्त शित् शवपेट्यांचे सौ.साधनाताईंच्या शुभहस्ते लोकार्पण.. जिल्हा केमिस्ट संघटना कार्याची केली प्रशंसा..

जामनेर – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने राज्याचे संकटमोचक ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने ४ शीत  शवपेट्यांचे लोकार्पण जामनेर नगराध्यक्षा सौ.साधना ताई महाजन यांच्या शुभ हस्ते आज दि.१७ रोजी जामनेर येथे शिवाजीनगर परिसरात वीर सावरकर सभागृहाच्या पटांगणात भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबीर स्थळी करण्यात आले.या प्रसंगी जामनेर तालुक्यातील सर्व गणमान्य लोक प्रतिनिधी ,पदाधिकारी उपस्थित होते.यात जितेंद्र पाटील जा.तालुका एज्युकेशन सोसा.,जे.के.चव्हाण राव साहेब,संजयदादा गरूड ,उपनगराध्यक्ष प्रशांत भोंडे,गटनेत्या संध्याताई  पाटील ,शरद पाटील ,नवल पाटील,नगरसेवक महेंद्र बावीस्कर सुहास पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या समवेत जिल्हा केमिस्ट संघटनेचे नरेश मंधान,जामनेर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष पंढरी भाऊ पाटील अध्यक्ष जामनेर तालुका मेडिकल रिटेल संघटना सदस्य मयुर पवार,अरुण कुलकर्णी,सुनील ललवाणी,तेजस कलंत्री,दीपक पाटील,इमरान खान,मुज्जमील शेख,विजय पाटील,हरीश पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.

वाढदिवस आयोजन समिती कमल फाउंडेशन तर्फे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळेंचा सत्कार

जिल्हाध्यक्ष केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे यांचा सत्कार देखील ना.गिरीश महाजन वाढदिवस आयोजन समिती कमल फाउंडेशन तर्फे करण्यात आला.जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी उत्तम असे भाषण करून ना.गिरीश भाऊंच्या समाज उपयोगी कर्तृत्ववान कामगिरीचा आलेख मांडला.तसेच जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या शीत शवपेटी सामाजिक सेवा उपक्रमाची माहिती मनोगतातून दिली. .सातत्याने ना.गिरीश भाऊंच्या पाठीशी असल्याची ग्वाही सुनिल भंगाळे यांनी दिली.

जिल्हा केमिस्ट संघटनेच्या सामाजिक सेवाभावी उपक्रमाची  सौ.साधना ताईंनी केली प्रशंसा ..

जामनेर नगराध्यक्ष सौ.साधना ताई महाजन यांनी जिल्हा केमिस्ट संघटनेच्या कार्याची व सुनिल भंगाळे यांच्या शीत शवपेटी संकल्पनेचे तोंड भरून कौतुक केले व संघटनेला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कमल फाउंडेशन वतीने देखील जिल्हा केमिस्ट संघेटनेने सामाजिक सेवेचा उपक्रम राबविला यासाठी जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ भंगाळे व संघटनेचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या