Thursday, September 3, 2026
Homeजळगांव शहरश्री संत अप्पा महाराज समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम..

श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम..

जळगांव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिरात दि.४ सप्टेंबर २०२६ शुक्रवार श्रावण कृष्ण अष्टमी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात श्रींचा महाअभिषेक, विशेष पुजा होऊन,रात्री १०ते ११वा श्री मुकुंद धर्माधिकारी यांचे प्रवचन होणार आहे. रात्री ११ते१२ वा,भजन कार्यक्रम श्रीकृष्ण महिला समुह सादर करणार आहेत.महाआरती रात्री १२.०० वा संपन्न होईल

तरी सर्व हरीभक्तांनी स्थळ श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर,जळगाव.येथे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प मुकुंद महाराज धर्माधिकारी यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या