जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेकरिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रीराम संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा दि.९ जुन सोमवारी ४ वा. श्रीराम मंदिरात हरिपाठ,परंपरेचे भजन आरती होइल. कुमारिका मुलींच्या व समस्त वारकरी मंडळीच्या शुभहस्ते पालखीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होऊन दुपारी ५ वा.पालखी निघणार आहे.
श्री.अप्पा महाराज समाधी येथे मुक्काम करून दि.१० जून वटपौर्णिमा मंगळवार सकाळी ६.३० ते ७.३० परंपरेचे भजन पूजन आरती होऊन सकाळी ८ वा.श्री.क्षेत्र पंढरपूर कडे पालखीचे असंख्य वारकरी मंडळी सह प्रस्थान होइल या वेळी जळगावातील भाविक श्री मुक्ताई पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.तरी सर्व भाविक भक्तांनी या वेळी पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांना तर्फे करण्यात आले आहे.
चला रे वैष्णव हो जाऊ, पंढरीसी… उद्या श्रीराम मंदिर संस्थानाचा श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा …
RELATED ARTICLES
