Wednesday, April 15, 2026
Homeजळगांव जिल्हाराष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी माजी एनसीसी कॅडेट्स सरसावले

राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी माजी एनसीसी कॅडेट्स सरसावले

जळगाव – दि ६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जिल्ह्यातील माजी एनसीसी कॅडेट्सचे स्नेहसंमेलन राष्ट्रसेवेच्या समर्थनासाठी यशस्वीरित्या संपन्न राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा जवानांची सीमेवर गरज भासते तशीच गरज आपण जिथे राहतो तेथील समाजातही भासते याची जाणीव ठेवून एनसीसीतील माजी कॅडेट्सने राष्ट्र सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचे ठरविले.18 महाराष्ट्र बटालियन मूळजी जेठा महाविद्यालय ,नूतन मराठा महाविद्यालय,नंदिनीबाई विद्यालय नाहटा महाविद्यालय भुसावळ जामनेर महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून सर्व एनसीसीच्या कॅडेट्सने एकत्र येऊन आज जळगाव येथे एक संघटन निर्माण करण्याचे ठरविले व त्याद्वारे राष्ट्रसेवेचे विविध उपक्रम हातात घेण्याचा प्रण घेतला.माजी छात्र सेना संघटन जळगाव जिल्हा अशा संघटनेचे कायदेशीर रजिस्टर रजिस्ट्रेशन करून या संस्थेद्वारे देशसेवेसाठी विविध तऱ्हेचे उपक्रम कार्यक्रम घेऊन त्याद्वारे जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे आपण सेवा द्यावी असे या संघटनेने ठरविले महाराष्ट्रात अशा एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांचे संघटन हे फार कमी जिल्ह्यांमध्ये आढळून येते अहमदनगर येथील दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील कॉलेजची ही संकल्पना तेथील मेजर संजय चौधरी यांच्या नेतृत्वाने राबवण्यात आलेली आहे. त्याचीच प्रेरणा घेऊन जळगावला माजी विद्यार्थ्यांनी एक आगळे वेगळे संघटन उभा करण्याचे आज ठरविले या संघटनेसाठी सर्वानुमते अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य,सचिव व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमुखाने करण्यात आली आणि या द्वारे सर्व माजी एनसीसी कॅडेट्सला आवाहन करण्यात आले आहे की सर्वांनी या संस्थेत सहभागी होऊन देश कार्यासाठी समर्पण भावनेने एकत्र यावे.कोणत्याही बटालियनचा कॅडेट जेडी किंवा एचडी केलेला या संघटनेत सहभागी होऊ शकतो असे आवाहन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माझी प्राचार्य व डायरेक्टर सतीश मोरे यांनी केले आहे यात सहभागी होण्यासाठी कॅडेट्सने खालील नंबर वर संपर्क करून आपले सदसत्व खालील नंबर वर संपर्क करून नोंदवता येईल अध्यक्ष सतीश मोरे 777 68 111 11, सचिव श्री हेमेंद्र सपकाळे 94 230 94 222, कोषाध्यक्ष संदीप सानप 98 909 78 878, पुढील स्नेहसंमेलन एनसीसी डे च्या आठवड्यामध्ये येणाऱ्या रविवारी साधारण नोव्हेंबर महिन्यात करण्याचे योजिले आहे तरी सर्व माझी एनसीसी कॅडेट्स मुलं मुली यांनी जास्तीत जास्त संख्येने या संघटनेत आपली देशाप्रती समर्पण सेवेची भावना पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावेसदर स्नेहसंमेलनासाठी 1990 पासून ते 2012 पर्यंतचे माजी कॅडेट्स सहभागी झाले होते त्यात मुख्यत्वे मेजर डॉक्टर संजय चौधरी डॉक्टर गोविंद बोरवले डॉक्टर सागर पाटील विलास बोंडे प्रशांत कोल्हे आर्मी पोलीस नेव्ही मध्ये असलेले माजी कॅडेट्स तसेच अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले कॅरेट्स आलेले होते,

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या