Wednesday, April 15, 2026
Homeजळगांव शहरजळगांव ते पंढरपूर पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आयुर्वेदिक औषध सामुग्री भेट..रामदास...

जळगांव ते पंढरपूर पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आयुर्वेदिक औषध सामुग्री भेट..रामदास आयुर्वेदिक फार्मसीचा दरवर्षी सेवाभावी उपक्रम..

जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगांव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळयात सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री संत मुक्ताबाई पायी पंढरपूर वारीत सहभागी वारकरी भक्तांच्या ऊत्तम आरोग्यासाठी विष्णु प्रोडक्ट्सचे रामदास आयुर्वेदिक औषधी भांडार तर्फे मोफत स्वरूपात आयुर्वेदिक औषधी सेवा रूजू करण्यात आली.श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादिपती ह.भ.प.श्री मंगेश महाराज जोशी यांचेकडे रामदास आयुर्वेदिक फार्मसीचे संचालक श्री.निलेश पाठक यांनी ही सामुग्री वारीत सहभागी वारकऱ्यांना मोफत स्वरूपात वितरण करण्यासाठी आज जूने जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानात सुपुर्द केली.दरवर्षी हा सेवाभावी उपक्रम रामदास आयुर्वेदिक फार्मसीचे माध्यमातून राबवला जात असतो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या