जळगांव – दि.३०(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)धर्म व न्याय यावर आधारित लोकाभिमुख राज्यव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, जळगाव शहरात भव्य”अहिल्या संदेश जागर यात्रा” तसेच महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या विशेष पर्वानिमित्त, ३०० चारचाकी वाहनांची ३०० किलोमीटर “अहिल्या संदेश यात्रा” जळगाव येथून सुरू करण्यात आली. या यात्रेद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श, विचार आणि कार्यास अभिवादन करण्यात आले. धर्म, न्याय आणि नारीशक्तीच्या जागृतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या यात्रेद्वारे साध्य करण्यात आले.यात्रेची सुरुवात शिवतीर्थ मैदान,जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली.यानंतर ही रॅली नेरी,जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, दीपनगर, भुसावळ,साकेगाव मार्गे प्रवास करत डॉ. उल्हास पाटील कॉलेज,गोदावरी फाउंडेशन येथे समारोप करण्यात आला.
या यात्रेप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी ना.गिरीश महाजन,आ.सुरेश भोळे,जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,अशोकभाऊ जैन(जैन उद्योगसमूह),गुलाबराव देवकर,माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे,जिल्हा संयोजक व सरचिटणीस अरविंद देशमुख,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील,प्रदेश सचिव रेखा वर्मा,जिल्हाध्यक्ष भारती सोनवणे,युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील,तसेच जिल्हा पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,आजी-माजी लोकप्रतिनिधी,नगरसेवक आणि असंख्य नागरिक सहभागी झाले.
भव्य मॅराथॉन स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर यांच्या वतीने भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. जळगाव शहरातील शेकडो माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्त्रीशक्तीचा जागर घडवून आणला.
या कार्यक्रमावेळी आ. सुरेश भोळे, जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,मंडल अध्यक्षा सौ. दीपमाला काळे, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याशिवाय, मल्हार सेनेचे धनगर समाजाचे प्रमुख नेते सुभाष सोनवणे, संदीप तेली, अॅड.कृषी सोनवणे, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तुळशीराम सोनवणे, अरुण ठाकरे, प्रभाकर नाकदे, रमेश सुलताने यांच्यासह धनगर समाजातील असंख्य बांधवांनी उपस्थिती लावून उत्सवाला भव्य रूप दिले.
या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दूरदृष्टी, सेवाभावी कार्य आणि संस्कार समाजापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न यशस्वीरीत्या पार पडला.
