Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरआंब्यांच्या‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन ..

आंब्यांच्या‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन ..

शिरसोली रस्तावर असलेल्या गौराई ग्रामोद्योग येथे आयोजित ‘मँगो फिस्टा’ आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. आर.टी. गुंजाटे, अजित जैन, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. बीके, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन व कंपनीचे सहकारी

जळगाव दि.२१ मे.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिस्टा’चे २१ रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले याप्रसंगी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित व अतुल जैन, अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन फार्मफ्रेश फू्डस लिं चे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन, अभंग जैन, आत्मन जैन, आंतरराष्ट्रीय पातळीचे आंबातज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. अनिल ढाके,, डॉ. बीके, डॉ.अनिल पाटील,कृषी विभागाचे सहकारी अजय काळे, नितीन पाटील, शंकर गाडेकर यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.हे‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शन आज २२ मे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १५० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत.जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ३४ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. ‘मँगो फिस्टा’ सह प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनाची क्षणचित्रे
• महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात पहिल्यांदाच असे प्रदर्शन.• दुर्मीळ व चविष्ट आंब्यांच्या अनेकोत्तम व्हरायटी एकाच छताखाली बघण्याची सुवर्ण संधी.
• जैन इरिगेशनने संशोधीत व विकसीत केलेल्या टिश्युकल्चर आंब्यांचाही समावेश.• प्रदर्शनास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या