जळगांव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे २६ ऑक्टोबर सोमवार रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त”सुरेल मैफिलीचे”आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते.
कार्यक्रमात सुंदर भावगीते,हिंदी मराठी चंद्र गिते ह्यांचा समावेश होता.तसंच गिटार वादन,बासरी वादन संहिता जोशी ह्यांनी केले.आणि स्वरा पाठक यांच्या व्हायलीन वादनाने मैफिलीला रंगत आणली.या सोबत हेमांगी जोशी,प्राजक्ता जोशी,शिल्पा पाटील, मनिषा पापरीकर,ह्यांनी गिते सादर केली.स्वरा पाठक ह्यांनी हार्मोनियमने साथ दिली आणि तबल्याची साथ श्रीधर जोशी ह्यांनी केली.कार्यक्रमाचे निवेदन हर्षा पाठक ह्यांनी केले कार्यक्रमानंतर महिलांनी अल्पोपहार आणि दुग्धपानाचा आस्वाद घेतला.
कायक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा शुक्ल ह्यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन महिला समिती प्रमुख वैदेही नाखरे ह्यांनी केले.रेवती कुरुंभट्टी, स्वप्नगंधा जोशी,वृषाली व्यवहारे,मीना जोशी समिती सदस्य आणि श्रद्धा कुलकर्णी का.सदस्य ह्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
