जळगाव :- दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क )
भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर यांच्या वतीने दि. ४ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यान येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत आर.आर.विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेसाठी ९ विद्यार्थी सहभागी झाले.भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर आयोजित वकृत्व स्पर्धेत आपल्या आर आर विद्यालयातील कुमारी संस्कृती शशिकांत फेगडे इयत्ता दहावी अ या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम अकराशे रुपये पारितोषिक प्राप्त झाले तसेच कुमारी दिव्या हरिश्चंद्र बडगुजर आठवी अ या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ रोख रक्कम पाचशे रुपये पारितोषिक प्राप्त झाले.सदरील स्पर्धा चार ऑक्टोंबर महात्मा गांधी उद्यान येथे झाले.
विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम अकराशे रुपये ,वक्तृत्व स्पर्धेसाठी सामाजिक व राष्ट्रीय विषय देण्यात आले होते.विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना,भावना व सामाजिक तसेच राष्ट्रीय विषयांवरील विचार विचारांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर,कल्पक व आशयपूर्ण माहिती प्रभावीपणे मांडली. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्याने आपले विचार विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पटवून सांगितले. विविध उदाहरणातून विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गिरीष रमणलाल भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.निबंध व वक्तृत्व समिती प्रमुख अंजली बोरसेपाटील व राजश्री भदाणे तसेच मराठी विभाग प्रमुख अपर्णा यावलकर, दिपक वाघ, दिवाकर साबळे,जितेंद्र पाटील त्यांच्या मार्गदर्शना मुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत उत्साहाने सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले.संजय पिले, जे जी पोळ,योगेश चौधरी, किशोर सोनवणे,कीर्तीकुमार शेलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वक्तृत्वकौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
