Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरनवलधाम गोगामेढी रामदेवबाबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन

नवलधाम गोगामेढी रामदेवबाबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन

जळगाव : – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री गोगादेवजी, श्री वीर रतनसिंहजी व रामदेवजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नवलधाम गोगामेढी रामदेव बाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साह पूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पालखी व निशाण (छडीची) मिरवणूक तसेच धार्मिक कार्यक्रम आणि महाआरती होणार आहे. मिरवणुकीत समाजबांधव व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती आयोजित करण्यात आली भाविकांनी उपस्थित राहून महाआरती व दर्शनाचा लाभ घेतला,

                   मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास प्रेरणास्थान माजी नगराध्यक्ष तथा जळगाव गोगारत्न पुरस्काराने सन्मानित भैय्या साहेब शिवचरण ढंडोरे यांची उपस्थिती राहणार आहे.प्रमुख अतिथींमध्ये पालकमंत्री नाशिक गिरीशभाऊ महाजन, तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, आयुक्त आदित्यजी जिवने, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी उपमहापौर करीम सालार, इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाब मलिक, माजी नगराध्यक्ष  चत्रभुज सोनवणे, नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक ललित कोल्हे, महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चांगरे यांचा समावेश आहे.  गुरुनानक मंदिर सेवा कारी छत्रूजी ढंडोरे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी नगरसेवक अतुलसिंग हाडा, माजी नगरसेवक मुकुंद सोनवणे, जमादार आत्माराम ढंडोरे आणि शाम बबन पवार यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.       आयोजक व निमंत्रक  ह्यांनी हा धार्मिक सोहळा मेहतर वाल्मिकी समाज पंचायत, जळगाव, श्री नवलधाम गोगामेढी बहुउद्देशीय संस्था तसेच श्री महर्षी नवलधाम ढंडोरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.  निमंत्रक म्हणून  मंदिराचे अध्यक्ष आशितोष ईश्वरलाल ढंडोरे, दीपक ढंडोरे, आकाश सोनवाल, दीपक  गोयर, लखनभगत  तंबोली तसेच व्यवस्थापक संदीप शिवचरण ढंडोरे, पूरशोत्तम कंडारे,विशालभगत लोट, बन्सी डाबोरे,सुनिल ढंडोरे,नरेश ढंडोरे,मनोज ढंडोरे,सुभाष बेंडवाल, सुरेश  सोनवाल,मंगल आठवाल,संजय गोयर,ईश्वर पवार,कांती चांगरे, कय्युम शेख,हुकमीचंद चावरिया, महेश शिंदे,खालिद एलेकर, विलास मेघे,सुनिल सपकाळे,विलास लोट, मनोज ज्यराम, संतोष उर्फ भोपू आठवाल, बबलु पवार, रोहित बेंडवाल,शंकर अंभोरे ,बंटी खरात, पप्पू पवार, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रम पत्रिकेत नमूद असलेल्या नावांनुसार ही माहिती समाविष्ट केली आहे. नवलधाम गोगामेढी रामदेवबाबा मंदिरातील या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या