जळगाव – दि.२४ अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक आढावा बैठक आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहत घेण्यात आली.
या बैठकीत जुलै २०२६ मध्ये नव्याने दाखल झालेले व पोलीस तपासावर प्रलंबित असलेले गुन्हे तसेच जुलै २०२६ अखेर पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांतील पीडित अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच तृतीयपंथीय व्यक्तींच्या विविध योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
बैठकीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
