जळगाव :- दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
केंद्र शासनाच्या‘हर घर तिरंगा’महोत्सवांतर्गत येथील शेठ ला. ना.सार्वजनिक विद्यालयात देशभक्तीचा संदेश देणारी रांगोळी स्पर्धा सोमवार,दि.१७ ऑगस्ट रोजी उत्साहात घेण्यात आली.या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे,पर्यवेक्षक जगदीश साळुंखे तसेच रांगोळी समिती प्रमुख सौ.कविता कुऱ्हाडे मॅडम उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक व सुंदर रांगोळ्या साकारल्या. विविध रंगांच्या कलात्मक रांगोळ्यांमुळे संपूर्ण शाळेचा परिसर रंगीबेरंगी आणि प्रसन्न झाला होता.स्पर्धेत खुशी पाटील (९ वी), सुहानी धुळे (९ वी),दुर्गेश्वरी धुळे (९ वी), मानसी घुगे (१० वी),पूनम वाणी (१० वी), अंकिता हणमंते (८ वी),प्रणाली कासार (८ वी), धनश्री बाविस्कर (८ वी),निकिता पिंगळे (१० वी) आणि अनमोल सोनार (८ वी) याविद्यार्थिनींनी विशेष आकर्षक रांगोळ्या साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमासाठी सौ.कविता कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच श्रीमती योगिता महाजन, सौ. मनीषा पवार आणि सौ.यामिनी चौधरी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी तसेच सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला,अशी प्रतिक्रिया विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली
