Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरब्राह्मण सभा जळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..

ब्राह्मण सभा जळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..

जळगाव :- दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील ब्राह्मण सभेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नितीन कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार,दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली.व्यासपीठावर उपाध्यक्ष अमोल जोशी,कोषाध्यक्ष संदीप कुळकर्णी,चिटणीस संजय जोशी,ॲड.अजय जोशी व जितेंद्र याज्ञिक उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.यावेळी चि.ओम घनश्याम धर्माधिकारी यांनी सुंदर बासरी वादन करून वातावरणात प्रसन्नता निर्माण केली.त्यानंतर अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या समाज बांधवांना शांतिमंत्र म्हणत श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे चिटणीस ॲड.अजय जोशी यांनी मागील वर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. अध्यक्ष नितीन कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.सन २०२५-२६ चे ताळेबंद पत्रक,उत्पन्न-खर्च पत्रक व अंदाजपत्रक कोषाध्यक्ष संदीप कुळकर्णी यांनी सभेसमोर सादर केले.सर्व आर्थिक पत्रकांसह विविध विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. सभासदांनी मांडलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सभेचे वातावरण खेळीमेळीचे राहिले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.आभार प्रदर्शन संजय जोशी यांनी केले.तर पसायदान सौ.वैदेही नाखरे यांनी म्हटले.यावेळी कार्यकारिणी सदस्य किरण कुळकर्णी ,मुकुंद धर्माधिकारी, उल्हास जोशी,अनिल जोशी ,कमलाकर फडणीस,राजेश कुळकर्णी,हेमंत वैद्य,सौ.श्रद्धा कुळकर्णी व सौ.वैदेही नाखरे उपस्थित होते.संस्थेचे व्यवस्थापक सचिन कुळकर्णी व सेवक अभिमान तायडे यांनी सभेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या